पुणे दिनांक २४ सप्टेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) मुंबईतील बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे यांचा एन्काऊंटर पोलिसांनी केल्या नंतर संपूर्ण महाराष्ट्रातून या एन्काऊंटर बाबत संतप्त अशा प्रतिक्रिया येत आहेत . दरम्यान सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी देखील अशीच संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.आत्मसंरक्षणासाठी एन्काऊंटर? एपीआय निलेश मोरेच्या पायावर गोळ्या झाडल्या मग पोलिसांनी देखील आरोपी अक्षय शिंदे याच्या पायावर का गोळ्या मारण्यात आल्या नाहीत? आम्ही वेडे आहोत का ? असे सामाजिक महिला कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी म्हटले आहे.तसेच या प्रकरणी महाराष्ट्राचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिलाच पाहिजे.असेही त्या म्हणाल्या दरम्यान काल सोमवारी सायंकाळी आरोपी अक्षय शिंदेंच्या एन्काऊंटरवर त्यांनी हे ट्विट केले आहे.