Home Breaking News फुलंब्री तालुक्यात तहसीलदारांची खुर्चीच पेटवली, मराठा आरक्षण प्ररकणी मराठा आंदोलक आक्रमक

फुलंब्री तालुक्यात तहसीलदारांची खुर्चीच पेटवली, मराठा आरक्षण प्ररकणी मराठा आंदोलक आक्रमक

57
0

पुणे दिनांक २४ सप्टेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) मराठावाड्यात मराठा आंदोलकाचा संयम आता सुटल्याने ते आता आक्रमक झाले आहेत.आता राज्यात आरक्षणाची लढाई अस्मितेचा प्रश्न निर्माण झाला आहे.आता आरक्षणाच्या मुद्द्यावरून तिन्ही समाजांचे लोक हे चांगलेच आक्रमक झाले आहेत.यात आता प्रामुख्याने मराठा आंदोलक.ओबीसी आंदोलक तसेच धनगर समाजाचे आंदोलक यांचा यात समावेश आहे.यात तिन ठिकाणी उपोषण सुरु आहे.अंतरवाली सराटी‌.वडीगोद्री व पंढरपूर.हे तीन ठिकाण राज्याच्या नकाशावर आले आहेत.तसेच महायुती सरकारपुढे या मुळे विधानसभांच्या निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर आता मोठ्या प्रमाणावर पेच निर्माण झाला आहे.तर यात काही मंडळी विनाकारण आगीत तेल ओतून राज्यात सरकार पुढे पेच वाढवत आहेत.त्यामुळे मराठा समाजाचे आंदोलक आता चांगलेच आक्रमक झाले असून त्यांनी मराठावाड्यातील छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यात उग्र असं आंदोलन सुरू केले आहे.

दरम्यान छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यात मराठा समाजाचे आंदोलक चांगलेच आक्रमक झाले असून या आंदोलकांनी तहसील कार्यालयात येऊन परिसरात प्रचंड अशी घोषणाबाजी केली.त्यानंतर तहसीलदार यांची खुर्ची कार्यालयाच्या प्रांगणात आणून ती पेटवून दिली दरम्यान उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाची दखल घेण्या साठी ही खुर्ची पेटविण्यात आली आहे.तसेच फुलंब्री तालुक्यात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.दरम्यान मराठा समाजाचे नेते व आंदोलक व उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील हे दिनांक १६ सप्टेंबर पासून अंतरवाली सराटीत उपोषणाला बसले आहेत.ते सलग सहाव्यांदा उपोषणाला बसले आहेत. दरम्यान महायुतीच्या सरकारने मुंबईत वाशित दिलेलं आश्वासन सरकारने पूर्ण केले नाही.त्याला आता सहा महिने उलटून गेली आहेत.तरी या सरकारने कोणतीही प्रकारची अंमलबजावणी केली नाही.त्यामुळे मराठा समाजाच्या आंदोलक आता चांगलेच आक्रमक झाले आहेत.

Previous articleगृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा राजीनामा मिळालाच पाहिजे -अंजली दमानिया
Next articleमुसळधार पावसाने पुण्याला चांगलेच झोडपले,एस पी काॅलेजच्या मैदानावर देखील पाणीच पाणी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here