पुणे दिनांक २४ सप्टेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) पुण्याला आज दुपारीच मुसळधार पावसाने चांगलेच झोडपले आहे.दरम्यान दुपारी दोन वाजण्या च्या सुमारास चांगलाच पाऊस कोसळला आहे. त्यामुळे रस्त्याला नदी नाल्यांचे स्वरूप आले आहे. आज सकाळपासूनच पाऊस कोसळत आहे.हा परतीचा पावसाचा प्रवास सुरू आहे.दुपारी एक तासा पेक्षा जास्त पाऊस पुण्यात कोसळत होता.दरम्यान आज कोसळणारा पाऊस पुणे शहरसह उपनगरात देखील मोठ्या प्रमाणावर कोसळत होता.त्यामुळे सर्वत्रच पाऊस कोसळत आहे.दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुण्यात येत असून त्यांची सभा पुण्यातील एस पी काॅलेजच्या मैदानावर होणार असल्याने तिथे सभा करीता व्यवस्था करण्यात येत होती.त्या मैदानावर देखील आजच्या पावसाने पाणीच पाणी झाले आहे.आता त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर जेसीबीच्या सहाय्याने मुरुम टाळण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.दरम्यान हवामान विभागाच्या वतीने परतीचा पावसाचा प्रभाव अजून ४ ते ५ दिवस रहाणार आहे. दरम्यान पुढील ३ ते ४ तासात कोकणातील रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात देखील मुसळधार पाऊस कोसळणार आहे.तसेच येणाऱ्या २४ तासात भंडारा. गोंदिया.चंद्रपूर.गडचिरोली.नागपूर यवतमाळ मध्ये विजांच्या कडकडाटात व मुसाळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे.असा अंदाज हवामान विभागाच्या वतीने वर्तविण्यात येत आहे.