पुणे दिनांक २५ सप्टेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) मराठा समाजाचे नेते व आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी दिनांक १७ सप्टेंबर पासून अंतरवाली सराटीत उपोषण सुरू केले आहे.आज त्यांचा उपोषणाचा नववा दिवस आहे.दरम्यान मंगळवारी उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांची तब्येत खालावल्याने तसेच समर्थांच्या आग्रहानंतर त्यांना मध्यरात्री १२ वाजण्याच्या सुमारास सलाईन लावण्यात आले आहे.दरम्यान मराठा समाजाला ओबीसी मधूनच आरक्षण मिळावे.सगेसोयरेची अमंल बजावणी तातडीने करण्यात यावी.तसेच हैदराबाद. सातारा व बाॅम्बे या तिन्ही गॅझेटची तातडीने अंमल बजावणी करण्यात यावी .व मराठा समाजाच्या आंदोलनकर्त्यांवरील गुन्हे तातडीने मागे घेण्यात यावे. अशी मागणी उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी महायुतीच्या सरकारकडे केली आहे.दरम्यान यावर हे सरकार केवळ वेळकाढूपणा करत आहे.मागील सहा महिन्यांपासून सरकारने यावर कोणत्याही प्रकारची कारवाई केली नाही.दरम्यान यांच्या निषेध म्हणून मराठा समाजाच्या आंदोलकांनी जिल्हा बंदची हाक देखील दिली होती.तसेच राज्यातील अनेक भागात बंद ठेवण्यात आला होता.दरम्यान मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात मोठ्या प्रमाणावर मराठा समाजाचे आंदोलक हे अंतरवाली सराटीत लाखोंच्या संख्येने दाखल झाले आहेत.