पुणे दिनांक २५ सप्टेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उद्या दिनांक २६ सप्टेंबर रोजी गुरुवारी पुणे दौऱ्यावर येणार आहेत. त्या करिता पुण्यात जय्यत तयारी सुरू करण्यात आली आहे.दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर आज मध्यरात्रीपासून गुरुवारी मध्यरात्री पर्यंत खासगी अवकाश उड्डाणांना मनाई करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सिव्हिल कोर्ट ते स्वारगेट स्थानकापर्यंत भुयारी मार्गातून मेट्रो प्रवास करणार आहेत.तसेच ते स्वारगेट ते कात्रज या मेट्रो मार्गाचे भूमिपूजन करणार आहेत. तसेच पुण्यातील एस पी काॅलेजच्या मैदानावर त्यांची जाहीर सभा होणार आहे.