Home Breaking News पुण्यात आज मुसळधार पाऊस.ससून रुग्णालया समोर गुडघ्यापर्यंत पाणी अनेक गाड्या पडल्या बंद

पुण्यात आज मुसळधार पाऊस.ससून रुग्णालया समोर गुडघ्यापर्यंत पाणी अनेक गाड्या पडल्या बंद

71
0

पुणे दिनांक २५ सप्टेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आज देखील परतीच्या प्रवासाने पुणेकर नागरिकांना झोडपून काढले आहे.आज पुण्यात दुपारी सर्वत्र पुणे शहरात तसेच उपनगरात मुसाळधार पाऊस कोसळला आहे.या पावसाने पुणे ससून रुग्णालया समोर तसेच जिल्हाधिकारी कार्यालय व पुणे स्टेशन परिसरात गुडघ्यापर्यंत पाणी साचले आहे.तसेच या  पावसामुळे अनेक दुचाकीच्या सायलंसर मध्ये पाणी जाऊन दुचाकी व तीन चाकी रिक्षा बंद पडल्याने कामावरुन घरी जाणा-या कामगारांचे चांगलेच हाल झाले आहे.तर ससून रुग्णालयासमोर एक पीएमपीएम एलची बस या पाण्यात बंद पडल्याने बंडगार्डन पोलिस स्टेशनच्या सिग्नल जवळ वाहतूक व्यवस्था ब-याच वेळ कोलमडून पडली होती.तसेच शाळा मधील विद्यार्थ्यांचे देखील हाल यावेळी या पावसामुळे झाले आहे.दरम्यान अजून देखील मुसळधार पाऊस कोसळत आहे.तसेच आज पुण्याला हवामान विभागाच्या वतीने रेड अलर्ट घोषित करण्यात आला आहे.पुण्यातील कॅम्प भागात देखील पाणी साचले आहे.वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणावर झाली आहे.

Previous articleमनोज जरांगे पाटील यांनी नवव्या दिवशी उपोषण सोडले
Next articleपुण्याला सलग दोन दिवस पावसाचा रेड अलर्टचा इशारा , पुण्यात मुसळधार पाऊस सुरूच धरणं भरली धरणातून होऊ शकतो विसर्ग तीन तासात १२४ मिली मीटर पाऊस

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here