Home Breaking News पुण्यात सलग तीन दिवस परतीचा मुसळधार पावसाने धरणं भरली धरणातून मुठा नदीच्या...

पुण्यात सलग तीन दिवस परतीचा मुसळधार पावसाने धरणं भरली धरणातून मुठा नदीच्या पात्रात विसर्ग सुरू, खबरदारी घेण्याचे आवाहन

61
0

पुणे दिनांक २५ सप्टेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) मागील तीन दिवसांपासून परतीचा पावसा चार प्रवास सुरू आहे.सलग तीन दिवस मुसळधार पाऊस कोसळत असल्याने.पुण्यातील सर्वच धरणं भरली आहेत आज दुपारी तीन तास झालेल्या मुसळधार पाऊस हा १२४ मिली मीटर झाला आहे. त्यानंतर देखील पुण्यात सलग पाऊस सुरू आहे.त्या मुळे आता पानशेत धरणातून १ हजार ९५४ क्यूसेकचा विसर्ग हा मुठा नदीच्या पात्रात सुरू करण्यात आला आहे.दरम्यान पावसाच्या प्रमाणानुसार सदरचा विसर्ग हा कमी जास्त प्रमाणात करण्याची शक्यता आहे.तरी नदी काठच्या नागरिकांनी सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.तसेच नागरिकांनी नदीच्या पात्रात उतरु नये.तसेच वरसगाव धरणातून एकूण २ हजार ८८ क्यूसेकने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. तसेच आता सुरू असलेल्या पावसामुळे तसेच आवश्यकतेनुसार विसर्गात बदल करण्यात येईल तरी नागरिकांनी याची दखल घ्यावी.तसेच पुण्यातील धरणातून सोडलेले पाणी हे भीमा नदीच्या पात्रातून उजनी धरणात जमा होत आहे.तसेच सध्या भीमा नदीच्या पात्रात एकूण ३१ हजार ६०० क्यूसेकने मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सुरू आहे.दरम्यान  यात देखील पावसाच्या परिस्थिती नुसार विसर्गात बदल करण्यात येणार आहे.तरी यांची दखल सर्व नागरिकांनी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.

Previous articleमुंबई पोलिस दलातून बोलतोय ! पुण्यात जेष्ठ नागरिकाच्या खात्यातून २७ लाख रुपये गायब
Next articleठाणे ते मुंब्रा रोडवर भल्ली मोठी दरड कोसळली, जीवीत हानी नाही वाहतूक व्यवस्था कोलमडली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here