पुणे दिनांक २५ सप्टेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती आलेल्या अपडेट नुसार पुण्यातून एक खळबळजनक घटना घडली असून. मुंबई मधील पोलिस दलातून बोलतोय,असं सांगून सायबर गुन्हेगाराने पुण्यातील एका जेष्ठ नागरिकाची तब्बल २७ लाख रुपयांची फसवणूक केली आहे.या प्रकरणी संबंधित जेष्ठ नागरिकाने या फसवणूक प्रकरणी पर्वती पोलिस स्टेशन मध्ये फिर्याद दाखल केली आहे. सदर प्रकरणी पोलिसांनी 👮 दिलेल्या माहितीनुसार मुंबईतील एका सायबर ठगांने जेष्ठ नागरिकाला मी मुंबई पोलिस दलातून बोलतोय.असं सांगून तुमच्या आधारकार्डचा वापर करून पिस्तूल व अमली पदार्थ खरेदी करण्यात आले आहेत.त्यामुळे तुम्ही तातडीने २७ लाख रुपये जमा करा.असं सायबर गुन्हेगाराने जेष्ठ नागरिकाल सांगितले.व पैसे जमा करताच सायबर ठगाने त्याचा फोन बंद केला आहे. दरम्यान जेष्ठ नागरिकाच्या फिर्यादी वरुन अज्ञात गुन्हेगारा विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या बाबतचा पुढील तपास पर्वती पोलिस करीत आहेत.