Home Breaking News आमदार अपात्रता प्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी, आजच्या सुनावणीकडे लागलं सर्वांचे लक्ष

आमदार अपात्रता प्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी, आजच्या सुनावणीकडे लागलं सर्वांचे लक्ष

60
0

पुणे दिनांक २५ सप्टेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ चिन्ह अजित पवार यांना देण्याच्या निर्णयाविरोधात जेष्ठ नेते शरद पवार यांच्या पक्षाने सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे.सदरची सुनावणी ही न्यायमूर्ती सुर्यकांत यांच्या पिठासमोर ही सुनावणी होणार आहे. मागील अनेक महिन्यांपासून या प्रकरणांवर सुनावणी झालेली नाही.त्यामुळे आजच्या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान मागच्या सुनावणीवेळी जेष्ठ नेते शरद पवार यांच्या पक्षाकडून प्रकरण मेंशन करण्यापूर्वी विधान सभा निवडणुका लक्षात घेता म्हत्वाची मागणी करण्यात आली आहे.त्यामुळे आज होणा-या सुनावणी कडे विशेष लक्ष रहाणार आहे.दरम्यान विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा परिणाम त्यावर होऊ शकतो.या अर्थाने सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश महत्त्वाचे असतील दरम्यान जेष्ठ नेते शरद पवार यांच्या पक्षाकडून सर्वोच्च न्यायालयात या मागण्या केल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व घड्याळ चिन्ह या प्रकरणाचा सर्वोच्च न्यायालयाचा निकाल लागत नाही तोपर्यंत अजित पवार यांना नवीन चिन्ह द्या.तसेच अजित पवार यांना नवीन चिन्ह घेण्याची मागणी करायला सांगा ‌.दरम्यान निवडणूक आयोगाने जो निकाल दिला आहे तो आमदारांच्या आधारावर दिला आहे.त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा निवडणुकीसाठी त्यांना अजित पवार यांना नवीन चिन्ह घेण्यास सांगावं अशा शरद पवार यांनी मागण्या केल्या आहेत.

 

Previous articleमुसळधार पावसाने पुण्याला चांगलेच झोडपले,एस पी काॅलेजच्या मैदानावर देखील पाणीच पाणी
Next articleमहाराष्ट्रात गाजलेल्या बदलापूर एन्काऊंटर प्रकरणी आज हायकोर्टात सुनावणी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here