पुणे दिनांक २५ सप्टेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती आलेल्या अपडेट नुसार ठाणे ते मुंब्रा बायपास रोडवर दरड कोसळली आहे.यात कोणत्याही प्रकारची जीवीतहानी झालेली नाही.परंतू या बायपास रोडवरील वाहतूक व्यवस्था मोठ्या प्रमाणावर कोलमडली आहे.दरम्यान आज परतीचा पाऊस हा मोठ्या प्रमाणावर कोसळत आहे.त्यामुळे ठाणे ते मुंब्रा बायपास रोडवर भल्ली मोठी दरड कोसळण्याची घटना घडली आहे.त्यामुळे या बायपास रोडवर आता मोठ्या प्रमाणावर वाहनांच्या रांगाच रांगा आता लागल्या आहेत.तसेच उद्या ठाणे तसेच पालघर भागात देखील मुसळधार पाऊसाचा इशारा देण्यात आला आहे.तरी नागरिकांनी याची दखल घ्यावी असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.