Home Breaking News पुण्यातील कात्रज.बालाजीनगर.अगम मंदिर.कोंढवा बुद्रुक भागात उद्या पाणीपुरवठा रहाणार बंद

पुण्यातील कात्रज.बालाजीनगर.अगम मंदिर.कोंढवा बुद्रुक भागात उद्या पाणीपुरवठा रहाणार बंद

81
0

पुणे दिनांक २५ सप्टेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) उद्या गुरुवारी दिनांक २६ सप्टेंबर रोजी पुण्यातील कात्रज भागातील केदारेश्वर पंपिंग स्टेशन  मधील मुख्य व्हाॅल्व व मुख्य जलवाहिनी दुरुस्तीचे काम करण्यासाठी कात्रज.बालाजीनगर.अगम मंदिर.  कोंढवा बुद्रुक या भागातील पाणी पुरवठा बंद राहणार आहे.त्यानंतर शुक्रवारी दिनांक २७ सप्टेंबर रोजी सकाळी उशिरा कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांनी आजच पाणी साठा घरात करुन ठेवावे असे पुणे महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाच्या वतीने माहिती देण्यात आली आहे.

दरम्यान उद्या या भागात पाणी पुरवठा बंद राहणार आहे.बालाजीनगर.काशिनाथ पाटीलनगर.श्रीहरी सोसायटी.कात्रज गाव.गुजरवाडी फाटा.गुजरवाडी रोड.वरखडे नगर.ओमकार.भूषण.उत्कर्ष.राजस.सर्व सोसायट्या.व परिसर.कदम प्लाझा.सुखसागरनगर. अंगण मंदिर.संतोष नगर.अंजलीनगर.दत्त नगर. जांभूळवाडी रस्ता.आंबेगाव रस्ता.वंडरसिटी.मोरेबाग. चंद्रभागानगर.भारती विद्यापीठ परिसर.कात्रज-कोंढवा संपूर्ण परिसर.शिवशंभोनगर.गोकूळनगर.साईनगर. गजानननगर.काकडेवस्ती.अशरफनगर.ग्रीनपार्क. राजीव गांधी नगर.सुपर इंदीरा नगर.काही भाग. इस्कॉन मंदिर परिसर.टिळेकर नगर.कोंढवा बुद्रुक गाव . लक्ष्मी नगर.सोमजी बस स्टॉप.परिसर.पुण्यधाम आश्रम रस्ता.साई सर्व्हिस.पारगे नगर.खडी मशिन. परिसर.बधेनगर.येवलेवाडी.व कामठे-पाटीलनगर या भागातील पाणी पुरवठा बंद राहणार आहे.तरी या भागातील नागरिकांनी याची दखल घ्यावी.

Previous articleतब्येत खालावल्याने उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी घेतले उपचार
Next articleमनोज जरांगे पाटील यांनी नवव्या दिवशी उपोषण सोडले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here