Home Breaking News पुण्याला सलग दोन दिवस पावसाचा रेड अलर्टचा इशारा , पुण्यात मुसळधार पाऊस...

पुण्याला सलग दोन दिवस पावसाचा रेड अलर्टचा इशारा , पुण्यात मुसळधार पाऊस सुरूच धरणं भरली धरणातून होऊ शकतो विसर्ग तीन तासात १२४ मिली मीटर पाऊस

67
0

पुणे दिनांक २५ सप्टेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) पुण्यात सलग तीन दिवस पाऊस कोसळत आहे.पुढील दोन दिवस पुण्याला पावसाचा रेड अलर्ट घोषित करण्यात आला आहे.दरम्यान परतीचा पाऊस मोठ्या प्रमाणावर कोसळत आहे.आज सुध्दा तिसऱ्या दिवशी देखील पुण्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे .या पावसामुळे पुण्यातील सर्वच धरणं भरली आहेत.त्यामुळे धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू होऊ शकतो.त्यामुळे नदीच्या काठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला.आज तीन तासात एकूण १२४ मिली मीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे.

दरम्यान आज झालेल्या मुसळधार पावसामुळे पुण्यातील सर्वच भागात मुसळधार पाऊस कोसळत आहे.तसेच पुणे जिल्ह्यात देखील मोठ्या प्रमाणावर पाऊस कोसळत आहे.पिंपरी चिंचवड.भोसरी चाकण मोशी . तळेगाव मावळ तसेच धरण क्षेत्रात देखील मुसळधार पाऊस कोसळत आहे.त्यामुळे पुण्यातील खडकवासला.पानशेत.वरसगाव .धरणं मोठ्या प्रमाणावर भरले असल्याने धरणातून मुठा नदीच्या पात्रात पाणी सोडले जाण्याची शक्यता आहे.तसेच येणाऱ्या २४ तासात पुणे शहरासह जिल्ह्यात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटात वादळी वाऱ्यासह अतिवृष्टी होण्याचा अंदाज हवामान विभागाच्या वतीने वर्तविण्यात आला आहे.

Previous articleपुण्यात आज मुसळधार पाऊस.ससून रुग्णालया समोर गुडघ्यापर्यंत पाणी अनेक गाड्या पडल्या बंद
Next articleमुंबई पोलिस दलातून बोलतोय ! पुण्यात जेष्ठ नागरिकाच्या खात्यातून २७ लाख रुपये गायब

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here