Home Breaking News मुंबईतील शाळांना पावसामुळे उद्या सुट्टी जाहीर, शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांची माहिती

मुंबईतील शाळांना पावसामुळे उद्या सुट्टी जाहीर, शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांची माहिती

126
0

पुणे दिनांक २५ सप्टेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती आलेल्या अपडेट नुसार उद्या  मुंबईतील शाळांना उद्या सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.अशी माहिती शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी माध्यमांना दिली आहे.दरम्यान परतीचा पाऊस मोठ्या प्रमाणावर मुंबईतील सर्वच भागात तसेच उपनगरात देखील मुसळधार कोसळत आहे.या पावसाचा त्रास  लहान मुलांना होऊ नये म्हणून मुंबईतील सर्वच शाळांना आता महाराष्ट्र सरकारच्या वतीने सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

दरम्यान यावेळी माध्यमांशी बोलताना शिक्षणमंत्री दीपक केसरकर हे म्हणाले की मुंबईत मोठ्या प्रमाणावर परतीचा पाऊस कोसळत आहे.तसेच उद्या मुंबई व ठाण्याला हवामान विभागाच्या वतीने रेड अलर्ट घोषित करण्यात आला आहे.आज प्रचंड प्रमाणावर पाऊस मुंबईत झालेला आहे.त्यामुळे सर्वत्र मोठ्या प्रमाणावर पाणी साचले आहे.सदरचे पाणी ओसरायला उद्याचा देखील दिवस जाणार आहे.त्या मुळे सकाळी शाळे करीता उद्या बाहेर पडणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणावर त्रास होऊ शकतो. त्या मुळे उद्या गुरुवारी दिनांक २६ सप्टेंबर रोजी मुंबईतील सर्व शाळांना सरकारच्या वतीने सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.याची पालकांनी दखल घ्यावी.

Previous articleठाणे ते मुंब्रा रोडवर भल्ली मोठी दरड कोसळली, जीवीत हानी नाही वाहतूक व्यवस्था कोलमडली
Next articleपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुण्यातील एसपी कॉलेजच्या मैदानावर सभास्थळी पावसाचं पाणीच पाणी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here