पुणे दिनांक २६ सप्टेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज गुरुवारी पुणे दौऱ्यावर येत आहेत.आज त्यांच्या हस्ते पुण्यातील भूमिकेत मेट्रो प्रकल्पाचे लोकार्पण होणार आहे.तर स्वारगेट ते कात्रज या मार्गाचे भूमिपूजन करण्यात येणार आहे.याच पार्श्वभूमीवर जिल्हा सत्र न्यायालय या मेट्रो स्टेशनवर पोलिसांकडून कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.दरम्यान आज पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वतः जिल्हा न्यायालय ते स्वारगेट या भूमिगेत मेट्रो मार्गाने प्रवास करणार आहेत मोदींच्या स्वागतासाठी मेट्रो प्रशासनाच्या वतीने तयारी पूर्ण झालेली पाहायला मिळत आहे.
दरम्यान या मेट्रोच्या कार्यक्रमानंतर या सोबत पुणे एसपी कॉलेजच्या मैदानावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा होणार आहे.दरम्यान या सभेतून पंतप्रधान नरेंद्र मोदी काय बोलणार हे पाहणं महत्त्वाचं आहे. दरम्यान काल पुण्यात परतीचा मुसळधार पाऊस झाला आहे.तसेच पुण्यातील एसपी कॉलेजच्या मैदानावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा होणार आहे.तिथे मैदानांवर सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे. तसेच मोठ्या प्रमाणावर चिखल झाला आहे.दरम्यान आज गुरुवारी देखील पुण्याला हवामान विभागाच्या वतीने रेड अलर्ट घोषित करण्यात आला आहे.त्यामुळे आज देखील मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही.