पुणे दिनांक २६ सप्टेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती आलेल्या अपडेट नुसार मुंबई येथील माहिम भागातील हाजी अली दर्ग्याला बाॅम्बच्या सहाय्याने उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. दरम्यान हा धमकीचा फोन हाजी अली दर्ग्याच्या ट्रस्ट मधील कार्यालयात आल्यावर एकच खळबळ उडाली दरम्यान सदरचा फोन हा बुधवारी आल्याचं पोलिसांनी सांगितले आहे.दरम्यान याप्रकरणी ताडदेव पोलिस ठाण्यात फोन करणा-या व्यक्तीच्या विरोधात विविध कलमांर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दरम्यान बुधवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास हाजी अली दर्ग्याच्या कार्यालयात हा धमकीचा फोन आला होता.हाजी अली दर्ग्यात बाॅम्ब ठेवल्याची माहिती देत तातडीने दर्गा खाली करण्याची धमकी त्यानं दिली होती.
दरम्यान मुंबईतील हाजी अली दर्ग्याच्या कार्यालयात बाॅम्ब ठेवल्याची धमकी देणाऱ्या व्यक्तीने स्वतःचे नाव पवन असे सांगितले होते. तसेच त्यांने यावेळी फोन वरून अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करत दर्ग्याच्या विषयी वादग्रस्त विधान देखील केले.असे ट्रस्टच्या अधिकारी यांनी पोलिसांना सांगितले आहे.त्या नुसार पोलिसांनी या पवन नावाच्या व्यक्तीच्या विरोधात कलम ३५१ (२)३५२ व ३५३ (२) ३५३(३) भादांवी २०२३ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.