पुणे दिनांक २६ सप्टेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) शिवसेना उध्वव ठाकरे गटाचे राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांना अब्रुनुकसानीच्या खटल्या मध्ये दोषी ठरविण्यात आले आहे.त्यांना १५ दिवसांची कैद व २५ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.दरम्यान मेधा सोमय्या यांनी शौचालय घोटाळा केला आहे.असा आरोप संजय राऊत यांनी केला होता.त्यानंतर यांचे पुरावे द्यावेत असं आव्हान किरीट सोमय्या यांनी संजय राऊत यांना दिले होते.परंतू या प्रकरणी राऊत कोणताही पुरावा देऊ शकले नाहीत. दरम्यान त्यानंतर मेधा सोमय्या यांनी मानहानीचा दावा दाखल केला होता.
दरम्यान यानंतर संजय राऊत म्हणाले की मी लोंका समोर मुद्दा आणला.अब्रुनुकसानी कुठे केली असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.तसेच मी कोणताही गुन्हा केला नाही.आमचे कोणतेही पुरावे न्यायालयाने मान्य केले नाही.असेही ते म्हणाले.विधानसभेच्या आधी मला तुरुंगात टाकायचे आहे.त्यासाठी मी तयार आहे.असे देखील राऊत यांनी सांगितले.आम्ही वरच्या न्यायालयात जाऊ असं देखील ते म्हणाले.संपूर्ण न्याय व्यवस्थेचे संघीकरण झाले आहे असे ते म्हणाले.