Home Breaking News गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयात अज्ञात महिलेकडून तोडफोड; मंत्रालयाची सुरक्षा रामभरोसे

गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयात अज्ञात महिलेकडून तोडफोड; मंत्रालयाची सुरक्षा रामभरोसे

48
0

पुणे दिनांक २७ सप्टेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक खळबळजनक अपडेट हाती आली आहे.चक्क मुंबईत मंत्रालयात सहाव्या मजल्यावर एक धक्कादायक घटना घडली आहे.आता तशी माहिती समोर आली आहे.एका महिलेनं उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाची तोडफोड केली आहे.सदरच्या महिलाने मंत्रालयात कार्यालया समोरील कुंड्या फोडल्या तसेच फडणवीस यांची नेमप्लेट तोडफोड करुन काढून टाकली आहे.त्यामुळे आता मंत्रालयाची सुरक्षा वा-या वर आहे.तसेच रामभरोसे आहे.असेच म्हणावे लागेल.

दरम्यान मुंबईतील मंत्रालयत कडेकोट सुरक्षा व्यवस्था असून देखील हा प्रकार कसा घडला.तसेच या महिलेला गेटपास कसा मिळाला . यावेळी बंदोबस्ता वर असलेले पोलिस काय करत होते.गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयासमोर पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला नव्हता का .असे एक ना अनेक प्रश्न आता या घटनेनंतर उपस्थित होत आहेत.म्हणजे आता मुंबईतील मंत्रालयाचीच सुरक्षा व्यवस्थाच एक प्रकारे रामभरोसे झाली आहे काय.असा गंभीर प्रश्न आता निर्माण झालेला आहे.दरम्यान आता राज्याच्या गृहमंत्रालयाचे कार्यलय सुरक्षित नसेल तर राज्याच्या सुरक्षाचाच प्रश्न गंभीर झाला आहे.असे अनेक नागरिक आता बोलत आहेत.तर विरोधी पक्षनेते देखील यावर आपली प्रतिक्रिया देत आहेत.

Previous articleपुणे सिव्हिल कोर्ट मेट्रो स्थानका बाहेर महाविकास आघाडीचे आंदोलन,श्रावण हर्डीकर यांच्या आश्र्वासना नंतर आंदोलन मागे
Next articleमंत्रालयात सहाव्या मजल्यावरील ‘ देवा भाऊंच्या ‘कार्यालयाची एका लाडक्या बहिणीने केली तोडफोड

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here