पुणे दिनांक २७ सप्टेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) या पूर्वी चिक्की मध्ये अळ्या मिळाल्या नंतर आता तर चक्क चाॅकलेट मध्ये देखील अळ्या सापडल्या आहेत.दरम्यान जिल्हा परिषदेच्या शाळे मध्ये दिल्या जाणाऱ्या प्रोटीनबार चाॅकलेट्समध्ये जिवंत अळ्या असल्याचे आढळले आहे.सदरची घटना ही धुळ्यातील साक्रीच्या भोनगाव येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील हा प्रकार आहे.दरम्यान या चाॅकलेटची एक्सपायरीची दिनांक अजून संपलेली नाही.तरी या विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आलेल्या चाॅकलेट्समध्ये अळ्या आढळून आल्या आहेत.यामुळे आता पालकांकडून संताप व्यक्त करण्यात आला आहे.दर्जाहीन चाॅकलेट विद्यार्थ्यांना देऊन विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ हे महायुतीचे सरकार खेळत आहे का ? असा प्रश्न आता पालकांकडून उपस्थित केला जात आहे.