पुणे दिनांक २७ सप्टेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) महाराष्ट्राची उपराजधानी नागपूर येथील ब्राऊनफिल्ड विमानतळाचा मार्ग आता मोकळा झाला आहे.दरम्यान आज सर्वोच्च न्यायालयाने क्युरेटिव्ह याचिका रद्द करण्यात आली आहे.दरम्यान विमान तळाचे काम जीएमआरला देण्याविरोधात याचिका दाखल करण्यात आली होती.दरम्यान यापूर्वी महायुती सरकारच्या काळात देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना सुरू झालेला हा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे. फडणवीसांनीच या प्रकल्पाचे नियोजन केले होते. दरम्यान आज सर्वोच्च न्यायालयाने याचिका रद्द केल्या नंतर आता या विमानतळाचा मार्ग मोकळा झाला आहे.
दरम्यान आज नागपुरातील ब्राऊनफिल्ड विमानतळा चा मार्ग मोकळा झाला आहे.यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आनंद व्यक्त केला आहे.दरम्यान आता सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे जागतिक दर्जाच्या ब्राऊनफिल्ड विमानतळ उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.तसेच हे विमानतळ आंतरराष्ट्रीय दर्जाचे कार्गो विमानतळसुध्दा असेल आणि दोन धावपट्ट्या असतील.हे नवे विमानतळ माझे स्वप्न होते.आणि त्या साठी मी सातत्याने परिश्रम घेतले,असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.