Home Breaking News मंत्रालयात सहाव्या मजल्यावरील ‘ देवा भाऊंच्या ‘कार्यालयाची एका लाडक्या बहिणीने केली तोडफोड

मंत्रालयात सहाव्या मजल्यावरील ‘ देवा भाऊंच्या ‘कार्यालयाची एका लाडक्या बहिणीने केली तोडफोड

53
0

पुणे दिनांक २७ सप्टेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) महाराष्ट्रात सर्वत्र लाडकी बहीण योजना जोरात सुरू आहे.कारण तिला आता दर महिन्याला १ हजार ५०० रुपये प्रति महिना मिळणार आहे.पण एक लाडकी बहीण मात्र चांगली नाराज व आक्रमक झालेली पाहायला मिळत तिने चक्क महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवा भाऊंच्या मंत्रालयामधील सहाव्या मजल्यावरील कार्यालयाचीच तोडफोड केली आहे.दरम्यान तोडफोडीनंतर आता देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.” त्या महिलेचे काय म्हणणे आहे.तसेच तिने ही तोडफोड कशा करीता केली.आपली बहिण चिडली असेल तर तिची व्यथा समजून घेऊन व ती दूर करण्याचा प्रयत्न करु . तसेच कोणी जाणिव पूर्वक पाठवले असेलतर देखील समजून घेऊ .असे फडणवीस म्हणाले.गुरुवारी एका महिलेने मंत्रालयातील देवा भाऊंच्या कार्यालया ची तोडफोड केली आहे.

दरम्यान या महिलेला सचिवांच्या बाजूने कार्यालयात जाण्याला कसा गेटपास मिळाला याची सुध्दा चौकशी होणार आहे.तसेच पोलिस बंदोबस्तावरील पोलिसांची दखल चौकशी होणार आहे.दरम्यान ही लाडकी बहीण दादर मधील असल्याची माहिती मिळत आहे.व ती एक मनोरुग्ण असल्याची देखील माहिती आता पुढे येत आहे.तसेच या महिलेने तिच्या सोसायटीत देखील बांबू हातात घेऊन ढिगांणा घातला होता अशी देखील माहिती आता पुढे येत आहे.दरम्यान या महीलाचे नाव देखील निष्पन्न झाले असून पण पोलिसांनी सदरचे नाव निष्पन्न करण्यास नकार दिला आहे.पण काही का असो आता मंत्रालयातील सहाव्या मजल्यावरील देवा भाऊंच्या कार्यालयाची तोडफोड केल्याने ही लाडकी बहीण मात्र चांगलीच फेमस झाली आहे.व तिची दहशतीची दखल मंत्रालयाने देखील घेतली आहे.

Previous articleगृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयात अज्ञात महिलेकडून तोडफोड; मंत्रालयाची सुरक्षा रामभरोसे
Next articleचिक्की नंतर चाॅकलेट मध्ये आढळल्या आळ्या जिल्हा परिषद मधील शाळेतील प्रकार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here