Home Breaking News सिनेट निवडणुकीत युवासेनाच्या वतीने १० जागा जिंकून अभाविपचा केला सुपडा साफ

सिनेट निवडणुकीत युवासेनाच्या वतीने १० जागा जिंकून अभाविपचा केला सुपडा साफ

53
0

पुणे दिनांक २७ सप्टेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) राज्य सरकारच्या वतीने तब्बल दोन वर्षे सिनेटच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या होत्या पण हायकोर्टाच्या आदेशानुसार ह्या निवडणूक पार पडली व आज या मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीत भाजपप्रणीत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा सुपडा साफ केला आहे.तर आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली युवासेनेने सर्वच जागा १० जिंकून दणदणीत विजय मिळवला आहे.त्यामुळे मागील निवडणुका प्रमाणे यंदाही युवा सेनेच्या वतीने सिनेटर आपलं वर्चस्व प्रस्थापित केले आहे.दरम्यान आजच्या निवडणूकीत युवासेनाच्या वतीने खुल्या प्रवर्गातील एकूण ५ जागा व राखीव गटातील ५ जागा अशा एकूण १० जागा जिंकल्या आहेत.यात युवासेनाच्या  सर्वच उमेदवारांना ५ हजार पेक्षा जास्त मते मिळाली आहेत.तर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या उमेदवारांना केवळ एक हजाराच्या आत मते मिळाली आहेत.यावेळी विद्यार्थी युवासेनेच्या वतीने ही तर झाकी आहे.व विधानसभा निवडणूक बाकी आहे. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत देखील महाविकास आघाडीच विजयी होईल असा विश्वास कार्यकर्त्यांनी यावेळी घोषणा देऊन केला आहे.

Previous articleनिवडणूक आयोगाच्या शिष्टमंडळाने घेतला आढावा, निवडणूक आयुक्तांची मुख्य सचिवांवर नाराजी उद्या घेणार पत्रकार परिषद
Next articleभीमा पाटस साखर कारखान्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत राडा,बोलू देत नाही म्हणून माइक फेकून दिला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here