पुणे दिनांक २७ सप्टेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमारांसह निवडणूक आयुक्त ग्यानेश कुमार व सचिव डॉ सुखबीर सिंह संधू यांनी आज आगामी विधानसभा निवडणुकी च्या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्य सचिव.पोलिस महासंचालक आदींसोबत निवडणूक आयोगाने राष्ट्रीय तसेच प्रादेशिक पक्षांची भेट घेऊन त्यांचा अभिप्रायही घेतला.दरम्यान निवडणूक आयोगाचे शिष्टमंडळ सध्या दोन दिवसीय महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत.यावेळी शिवसेना शिंदे गटाच्या वतीने महाराष्ट्रातील विधान सभा निवडणुका एकाच टप्प्यात घेण्याची मागणी केली आहे.तर राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या वतीने विधानसभा निवडणुकीत खर्चाची मर्यादा ही २० लाख रुपयांनी वाढविण्यात यावी.अशी मागणी केली आहे. तर काॅग्रेस पक्षाच्या वतीने महाराष्ट्रातील पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांची महाराष्ट्रातून बदली करण्यात यावी अशी मागणी निवडणूक आयोगाच्या शिष्टमंडळाकडे केली आहे.
दरम्यान केंद्रीय निवडणूक आयुक्तांनी राज्याच्या मुख्य सचिवांच्या कामांवर नाराजी व्यक्त केली आहे.दरम्यान विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अधिका-याच्य बदल्याबाबत केलेल्या सुचनांचा अहवाल न दिल्याने निवडणूक आयोगाच्या वतीने तोशारे वढण्यात आले. दरम्यान निवडणूक आयोगाने मुख्य सचिवांना पत्र लिहित एकाच जागी ३ वर्षांपेक्षा जास्त एकाच ठिकाणी जास्त काळ काम करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याच्या सूचना केल्या होत्या.पण याकडे सचिवांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप आज निवडणूक आयुक्तांनी राज्याच्या सचिवांवर केला आहे.दरम्यान उद्या शनिवारी दिनांक २८ सप्टेंबर रोजी निवडणूक आयोगाच्या वतीने पत्रकार परिषद घेण्याची शक्यता आहे.तसेच महाराष्ट्रातील निवडणूका ह्या ऑक्टोबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात लागण्याची शक्यता आहे.तर राज्यात आचारसंहिता ही १० ऑक्टोबर पासून लागण्याची शक्यता आहे.