पुणे दिनांक २७ सप्टेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) पुण्यातील सिव्हिल कोर्ट स्थानक येथे आज सकाळी सव्वा अकरा वाजण्याच्या सुमारास महाविकास आघाडीच्या वतीने आंदोलन सुरू केले आहे.दरम्यान पुणे पोलिसांनी या ठिकाणी कडेकोट पोलिस बंदोबस्त तैनात केला आहे.दरम्यान काल मेट्रो पदार्पणचा कार्यक्रम न झाल्याने आज जेष्ठ नागरिका घ्या हस्ते या मेट्रो स्थानकावर फित कापून मेट्रोचे उद्घाटन करण्याचे ठरविले होते.यावेळी महाविकास आघाडीच्या वतीने सांगण्यात आले की.हे सरकार पुणेकर नागरिकांना वेठीस धरत आहे.यावेळी मेट्रो स्थानकात घुसण्याचा प्रयत्न महाविकास आघाडीच्या वतीने करण्यात आला आहे.पुणे मेट्रोचे संचालक श्रावण हर्डीकर यांनी सांगितले की.२९ सप्टेंबर रविवारी ही मेट्रो कसल्याही परीस्थिती मध्ये सुरू करण्यात येणार आहे.असे सांगितले त्यानंतरच आज सुरू असलेले आंदोलन महाविकास आघाडीच्या वतीने मागे घेण्यात आले आहे.
दरम्यान उद्घाटन लांबणीवर टाकल्याने महाविकास आघाडीचे नेते आज आक्रमक झाले आहेत.दरम्यान या आंदोलनाला पुणे पोलिसांनी 👮 महाविकास आघाडीच्या नेत्यांना परवानगी नाकारण्यात आली आहे.दरम्यान आता मेट्रोच्या गेटवर महाविकास आघाडीचे आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी अडवले आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर महाविकास आघाडीचे कार्यकर्ते जमा झाले आहेत.तसेच गेटच्या बाहेरच महाविकास आघाडीचे नेते व कार्यकर्ते बसून आहेत दरम्यान एकंदरीत आज सिव्हिल कोर्ट ते स्वारगेट ही मेट्रोचे लोकार्पण झालेच पाहिजे यावर नेत्यांचे म्हणणे आहे.दोन दिवसांनी उद्घाटन कशासाठी व पुणेकर नागरिकांना हा वेठीस धरण्याचा हा केविलवाणी प्रयत्न महायुतीचे सरकार करत आहेत.हे पुणेकरांचे आंदोलन आहे.यावेळी महाविकास आघाडीच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली आहे.दरम्यान मेट्रोचे अधिकारी श्रावण हर्डीकर यांनी सांगितले की दिनांक २९ सप्टेंबरला रविवारी ही मेट्रो सुरू करणार आहे असे सांगितले.त्यानंतर हे आंदोलन महाविकास आघाडीच्या वतीने आंदोलन मागे घेण्यात आले आहे.