पुणे दिनांक २८ सप्टेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील पाटस येथे असलेल्या भीमा पाटस साखर कारखान्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत आज शनिवारी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास चांगलाच राडा झाला आहे. दरम्यान सभेत अध्यक्ष बोलू देत नसल्याने संतप्त झालेल्या एका सभासदाने चक्क भर सभेत माइक फेकून दिला आहे.त्यामुळे या सभेत चांगलाच गोंधळ निर्माण झाला आहे.
दरम्यान आज शनिवारी दिनांक २८ सप्टेंबर रोजी भीमा पाटस साखर कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली होती.या सभेला साखर कारखान्याच्या सभासदांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती.दरम्यान सदरची सभा सुरू असताना एका सभासदाने अध्यक्ष राहुल कुल यांना प्रश्न विचारला यावेळी अध्यक्षस्थानी सदरचा प्रश्न यापूर्वीच घेतला आहे.व त्या सभासदाला बोलू दिले नाही.त्या मुळे संतप्त झालेल्या सभासदाने भर सभेत माइक फेकून दिला.त्यामुळे वादाचं रुपांतर राड्यात झालं व एकच गोंधळ सुरू झाला.त्यानंतर काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.