पिंपरी -चिंचवड २९ सप्टेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) भावाला २१ वर्षीय युवकाने मारहाण केली म्हणून.संत्पत झालेल्या भावाने अन्य मित्रांच्या मदतीने पिंपरी चिंचवड येथे रहाणां-या विकी उर्फ शुभम परिहार ( वय २१ रा.पिंपरी चिंचवड पुणे) यांची हत्या केली आहे.दरम्यान या प्रकरणी चिखली पोलिसांनी 👮 तीन जणांच्या मुसक्या आवळल्या आहेत.दरम्यान सदर घटनेबाबत पिंपरी चिंचवड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एका १२ वर्षांच्या मुलाला विकी उर्फ शुभमने दिनांक २६ ला मारहाण केली होती.दरम्यान या मारहाणीचा बदला घेण्यासाठी यातील आरोपींने अन्य तीन जणांना बरोबर घेऊन शुभमला मारहाण केली.व त्या नंतर त्यांची हत्या करुन त्याचा मृतदेह मारुंजी येथील एका खदानीत टाकून दिला व यातील आरोपी हे फरार झाले होते.दरम्यान पिंपरी चिंचवड पोलिसांनी 👮 तपास करुन यातील तीन आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत.