पुणे दिनांक २९ सप्टेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) पुण्यातील सिव्हिल कोर्ट ते स्वारगेट असा मेट्रो आज सुरू होणार आहे.दरम्यान आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाइन पद्धतीने या मार्गाचे लोकार्पण होणार आहे.पुणे सिव्हिल कोर्ट ते स्वारगेट हा पुण्यातील पहिला भूमिगत मेट्रो मार्ग असून तो आज सायंकाळी चार वाजता प्रवाशांसाठी खुला करण्यात येणार आहे.दरम्यान या मार्गावर सिव्हिल कोर्ट.कसबापेठ.महात्माफुले मंडई.व स्वारगेट अशी एकूण चार मेट्रो स्थानके आहेत.