पुणे दिनांक ३० सप्टेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच मुंबईमधून एक खळबळजनक अपडेट हाती आली आहे.मुंबईतील समुद्रमार्गे असले ल्या अटल सेतू वरुन एका ४० वर्षीय व्यक्तीने चक्क उडी घेतली आहे.दरम्यान या संबंधीत माहिती पोलिस यंत्रणांना मिळाल्यानंतर पोलिसांनी 👮 घटनास्थळी तातडीने धाव घेतली आहे.तसेच पोलिस यंत्रणा व अग्निशमन दलाच्या वतीने या व्यक्तीचा शोध समुद्रात घेतला जात आहे.दरम्यान सदरच्या घटनेबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार या ४० वर्षीय व्यक्तीने सकाळच्या सुमारास अटल सेतू महामार्गावर त्याची कार पार्क केली.व समुद्रात उडी मारली आहे. दरम्यान या अटलसेतू महामार्गावर वाहतूक शाखेच्या पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेरे लावले आहेत.त्यानुसार वाहतूक पोलीसांनी सीसीटीव्ही कॅमेरेचे फुटेज बघीतले असता सकाळी ९ वाजूऊ५७ मिनिटांनी संबंधित कार चालकाने समुद्रित उडी घेतल्याचे दिसून आले आहे. दरम्यान संबंधित कारच्या नंबर प्लेट वरुन संबंधित व्यक्ती कोण आहे.याचा शोध मुंबई पोलिस करत आहेत. व संबंधित व्यक्तीचा शोध आता सुरू आहे.