पुणे दिनांक १ ऑक्टोबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच बाॅलीवूड मधून एक खळबळजनक अपडेट हाती आली असून अभिनेता गोविंदा हा त्याची परवानाधारक बंदूक साफ करताना चुकून स्टिगर ओढल्या मुळे गोळी पायाला लागून तो जखमी झालेला आहे त्याला उपचारासाठी मुंबईतील क्रिटीकेर हाॅस्पीटलमध्ये उपचार सुरू आहेत.सदरची घटना ही आज पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास त्यांच्या राहत्या घरी जुहू येथे घडली आहे.दरम्यान पोलिसांनी 👮 त्याची बंदूक आता ताब्यात घेतली आहे.घटना घडली तेव्हा गोंविदा हा घरी एकटाच होता.
दरम्यान गोविंदा यांच्या पायावर आता क्रिटी केअर रुग्णालयात शस्त्रक्रिया झाली आहे.दरम्यान अभिनेता गोविंदा यांच्या पायावर गोळी लागून जखमी झाल्याची माहिती मिळताच अनेक चाहत्यांनी रुग्णालयाबाहेर गर्दी केली आहे.दरम्यान पोलिसांच्या वतीने रुग्णालया बाहेर पोलिस बंदोबस्त तैनात केला आहे.तो लवकर बरा व्हावा म्हणून चाहते प्रार्थना करत आहेत.दरम्यान पोलिस या घटनेचा तपास करीत आहेत.