Home Breaking News पुण्यात कपडे धुण्यासाठी गेलेल्या युवकाचा पाण्याच्या डबक्यात पडून मृत्यू

पुण्यात कपडे धुण्यासाठी गेलेल्या युवकाचा पाण्याच्या डबक्यात पडून मृत्यू

47
0

पुणे दिनांक १ ऑक्टोबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती आलेल्या अपडेट नुसार पुणे येथे कपडे धुण्यासाठी गेलेल्या युवकाचा डबक्यात पडून मृत्यू झाला आहे.दरम्यान ही घटना खडकवास लाख धरणाच्या परिसरात ही दुर्घटना दुपारी घडली आहे.यात मृत्यू झालेल्या युवकाचे नाव मयूर नायडू       ( वय १७ ) असे आहे.

दरम्यान या घटनेबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार आज दुपारी १ ते २ वाजण्याच्या सुमारास खडकवासला धरणाजवळ असलेल्या पाण्या मध्ये अनेकजण कपडे धुण्यासाठी जातात आज दुपारी मयूर देखील गेला होता.दरम्यान तिथे असणाऱ्या डबक्यात तो पाण्यात उतरला असता त्याला पाण्याचा अंदाज न आल्याने तो या पाण्यात बुडाला आहे.दरम्यान बचाव पथकाने त्याचा मृतदेह बाहेर काढला आहे.दरम्यान या प्रकरणी उत्तमनगर पोलिस या प्रकरणी पुढील तपास करीत आहेत.

Previous articleबदलापूर घटनेतील आरोपी अक्षय शिंदेंच्या मृतदेहाला २४ तास सीसीटीव्हीत द्वारे बंदोबस्त
Next articleपुण्यात एका युवकाची तब्बल १ कोटी ९४ लाख रुपयांची फसवणूक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here