पुणे दिनांक १ ऑक्टोबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) मुंबई येथील बदलापूरातील अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेला मुंबईत दफन केल्यानंतर देखील आता पोलिसांना त्याच्या मृतदेहाची राखण करावी लागत आहे.तसेच त्या ठिकाणी एका झाडाला सीसीटीव्ही कॅमेरा 📷 देखील बसविण्यात आला आहे.दरम्यान अक्षय शिंदे याच्यावर उल्हासनगर येथील स्मशानभूमीत दफन करण्यात आले आहे. दरम्यान यावेळी येथील स्थानिक नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर दफन करण्यास विरोध केला होता.तरी देखील पोलिसांनी 👮 हस्तक्षेप करत येथेच अक्षय शिंदे याच्यावर दफन करण्यात आले होते.दरम्यान येथील स्थानिक नागरिकांच्या विरोधानंतर व त्यांच्या रोष लक्षात घेऊन या दफनभूमीत पोलिसांचे एक पथक २४ तास पहारा देत आहे तसेच मृतदेहाभोवती सीसीटीव्ही देखील बसविण्यात आले आहेत.