पुणे दिनांक ३० सप्टेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती आलेल्या अपडेट नुसार भंडारा जिल्ह्यात कामगार मंत्रालयाच्या वतीने पेटी व भांडे वाटपाचा कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्रात महायुती सरकारने घेतला आहे.दरम्यान असा एक कार्यक्रम भंडारा येथे घेण्यात आला होता.दरम्यान या कार्यक्रम मध्ये महिलां मोठ्या प्रमाणावर आल्या होत्या.यावेळी चक्क पोलिसांनी 👮 या महिलांवर मोठ्या प्रमाणावर लाठीचार्ज केला आहे.यावरुन काॅग्रेस पक्षाचे नेते व प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी यावेळी महायुती सरकार वर जोरदार निशाणा साधला आहे.दरम्यान यावेळी नाना पटोले यांनी म्हटले आहे की. महाराष्ट्रातील सर्व सामन्या महीलांना सन्मान देण्याऐवजी त्यांची थट्टा या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकारने केली आहे. हे काम हे महायुतीचे महाभ्रष्टयुती सरकार करत आहे.दरम्यान भंडारा जिल्ह्यात लाडक्या बहिणींवर चक्क 👮 पोलिसांनी केला आहे.दरम्यान या पोलिसांवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कार्यवाही करणार आहे का ? हेच महायुती सरकार संपूर्ण महाराष्ट्रात आमची लाडकी बहीण म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात राखी पौर्णिमा होऊन देखील राख्या मनगाटा पर्यंत बांधून देखावा करीत आहेत.यात एक फुल्ल मुख्यमंत्री व दोन हाफ उपमुख्यमंत्री करुन आहेत . यांच्यात हे श्रेय घेण्या साठी एकप्रकारे यांच्यात संपूर्ण महाराष्ट्रात श्रेय वादाची वलचढ दिसत आहे.कोण म्हणतं मी ‘ देवा भाऊ आहे ‘ तर कोण म्हणतं मी लाडका दादा आहे. तर कोण म्हणतं मी तुमचा लाडका मुख्यमंत्री आहे. हे सर्व येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक कलमी कार्यक्रम सध्या संपूर्ण महाराष्ट्रात चालू आहे.दरम्यान लक्षात ठेवा लाडकी बहीण आता तुम्हाला संपूर्ण महाराष्ट्रात माफ करणार नाही.असे काॅग्रेस पक्षाचे नेते व प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी या महायुतीच्या सरकारवर एक प्रकारे हल्लाबोल केला आहे.