Home Breaking News आज महात्मा गांधी जयंती निमित्त इंडिया आघाडीच्या वतीने मुंबईत पदयात्रा, महायुतीचे सरकार...

आज महात्मा गांधी जयंती निमित्त इंडिया आघाडीच्या वतीने मुंबईत पदयात्रा, महायुतीचे सरकार बरखास्त करा -नाना पटोले

36
0

पुणे दिनांक २ ऑक्टोबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आज २ ऑक्टोबर महात्मा गांधी यांची जयंती आहे.आज इंडिया आघाडीच्या वतीने मुंबईत पदयात्रा काढणार आहे.राज्यातील महिला सुरक्षा आणि सामाजिक शांततेसाठी या पदयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.आज बुधवारी दुपारी ३ वाजता मुंबईतील हुतात्मा चौकातून या पदयात्रेला सुरुवात होईल.तर महात्मा गांधींच्या पुतळ्याजवळ यात्रेचा समारोप होणार आहे.दरम्यान या पदयात्रेत इंडिया आघाडीतील महत्वाचे नेते या पदयात्रेत मोठ्या संख्येने सहभागी होतील.अशी माहिती काॅग्रेस पक्षाच्या वतीने देण्यात आली आहे.

दरम्यान महायुतीचे सरकार बरखास्त करा.अशी मागणी काॅग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी यांनी केली आहे.राज्यात सर्वत्र महिला व मुलींवर वारं वार अत्याचार होतात.अत्याचारा विरोधात मोर्चा काढला तर या महायुतीच्या सरकारने आमच्या विरोधात न्यायालयात जाऊन मोर्चावर बंदी आणली. दरम्यान महिला व मुलींवरील अत्याचार थांबवण्या साठी या महायुतीच्या सरकारने कडक उपाययोजना कराव्यात.अशी मागणी देखील यावेळी बोलताना नाना पटोले यांनी केली आहे.

Previous articleमहाराष्ट्रात ८ नवीन वैद्यकीय महाविद्यालयांना परवानगी – हसन मुश्रीफ
Next articleपुण्यातील बावधन बुद्रुक येथे एक हेलिकॉप्टर धुक्यामुळे कोसळून तीन जणांचा मृत्यू

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here