पुणे दिनांक २ ऑक्टोबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) उद्या दिनांक ३ ऑक्टोबर गुरुवार पासून नवरात्र उत्सव सुरू होत आहे. त्यामुळे नवरात्रामध्ये सर्वीकडे गरबा खेळण्यासाठी अनेक पंडालमध्ये मोठ्या प्रमाणात युवक व युवतींची गर्दी असते.दरम्यान यावर्षी गोमूत्र प्याल तरच गरबा खेळायला या.असे मध्यप्रदेशातील इंदूरचे भारतीय जनता पार्टीचे जिल्हा अध्यक्ष चिंटू वर्मा यांनी म्हटले आहे.दरम्यान नवरात्रीत गोमूत्र प्यायल्यानंतरच गरबा पंडालमध्ये प्रवेश द्यावा. गौ आपली माता आहे.त्यामुळे हिंदूना गोमूत्र पिण्यात कोणतीही अडचण येणार नाही.असेही त्यांनी म्हटले आहे.दरम्यान महिलेच्या सुरक्षेसाठी त्यांनी ही मागणी केली आहे.असे म्हटले जात आहे.दरम्यान वर्मा यांच्या या अनोखी मागणीची सर्वत्र चर्चा आता होत आहे.