पुणे दिनांक २ ऑक्टोबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती आलेल्या अपडेट नुसार पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील खामगाव येथे दोन आयशर टेम्पोच्या मध्ये चिरडून एका कामगाराचा मृत्यू झाला आहे. दरम्यान या अपघाताबाबत पोलिस सूत्रां कडून मिळालेल्या माहितीनुसार ही घटना खामगाव येथील अनमोल अॅग्रो कंपनीच्या पार्किंगमध्ये सदरची घटना घडली आहे.दरम्यान येथे एक टेम्पो पार्किंग मध्ये उभा होता.तर त्याच्याच मागे दुसरा आयशरचा टेम्पो ऊभा होता.दरम्यान त्याचवेळी एक व्यक्ती या दोन टेम्पोच्या मध्ये असलेल्या जागेतून जात असताना पुढील टेप्मो चालकाने टेम्पो रिव्हर्स मध्ये घेतला असता त्यावेळी संबंधित कामगार दोन टेम्पोच्या मध्ये चिरडून ठार झाला आहे.