पुणे दिनांक २ ऑक्टोबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती आलेल्या अपडेट नुसार ठाणे येथील वागळे इस्टेट भागात असणाऱ्या वेंकटरमणा चिप्स बनविणां-या कारखान्याला भीषण आग लागली आहे.दरम्यान मागील तीन तासांहून ही आग विझवण्याचा प्रयत्न अग्निशमन दलाच्या जवान हे काम करीत आहेत.दरम्यान या आगीत एकूण १० सिलेंडरचा स्फोट झाला आहे.आग विझवण्यासाठी तब्बल अग्निशमन दलाचे १० बंब घटनास्थळी धाव घेऊन ही आग आटोक्यात आणण्यासाठी अथक परिश्रम करत आहेत.
दरम्यान या प्रकरणी सूत्रांकडून मिळालेल्या माहिती नुसार.ठाण्यात वागळे इस्टेट भागात वेंकटरमणा चिप्स व कुरकुरे बनविणारी कंपनी आहे.दरम्यान या कंपनी ला दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास अचानक पणे आग लागली.यात या कंपनीत असणारे एकूण १० सिलेंडरचा स्फोट झाला आहे.तर अन्य २५ ते ३० सिलेंडर हालविण्यात आले आहे.ही आग विझवण्या साठी ठाणे.व नवीमुंबई येथील एकूण १० अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल होऊन जवान आग विझवण्यासाठी प्रयत्न करत आहे.दरम्यान सदर ची आग ही कशामुळे लागली हे अद्याप समजू शकले नाही.तसेच या आगीत कोणतीही प्रकारची जीवीत हानी झालेली नाही.