पुणे दिनांक २ ऑक्टोबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) बदलापूर दोन लहान चिमुकल्यावर शाळेत अत्याचार झाला होता.त्यात मुख्य आरोपी अक्षय शिंदे याचा एन्काऊंटर करण्यात आला होता.दरम्यान या प्रकरणातील बदलापूर शाळेचे संस्थापक व सचिव या दोघांच्या मुसक्या ठाणे क्राइम ब्रांचकडून कर्जत येथे आवळण्यात आल्या आहेत.त्यांना आता एसआयटीच्य ताब्यात देण्यात येणार आहे.उद्या त्यांना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
दरम्यान या प्रकरणी सूत्रांकडून मिळालेल्या माहिती नुसार बदलापूर येथील अत्याचार प्रकरणी या दोघांवर पोस्को कायद्या अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले होते.यांच्यावर शाळेतील सीसीटीव्हीचे फुटेज गायब करणे व शाळेत मोठ्या प्रमाणावर घटना घडून यांची माहिती पोलिसांना न देण्याबाबत देखील गुन्हा दाखल आहे.दरम्यान शाळेचे अध्यक्ष उदय कोतवाल व सचिव तुषार आपटे हे सव्वा दोन महिने फरार झाले होते. तसेच त्यांनी उच्च न्यायालयात जामीन मंजूर व्हावा या करीता याचिका दाखल करण्यात आली होती.परंतू न्यायालयाने दोघांचा जामीन फेटाळला होता. सरकार व पोलिस यंत्रणेची चांगलीच कानउघाडणी केली होती.त्यानंतर ठाणे क्राइम ब्रांचकडून कर्जत येथून त्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत.