पुणे दिनांक ३ ऑक्टोबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा केंद्रीय मंत्रीमंडळाने घेतलेला निर्णय हा ऐतिहासिक असून दरम्यान या निर्णयाने जगभरातील मराठी भाषिक व मराठी प्रेमी हे आनंदित झाले आहेत. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा ही महाराष्ट्राची गेल्या अनेक दक्षकापासूनची मागणी होती.असे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ट्विट केले आहे.दरम्यान या निर्णयामुळे मराठी भाषेचा गौरवशाली इतिहास, समृद्ध व सांस्कृतिक वैभव जगभर पोहोचेल.असेही ते म्हणाले आहेत.