पुणे दिनांक ३ ऑक्टोबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) मराठी भाषा ही भारताची शान आहे.तसेच या अभूतपूर्व भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्या बद्दल अभिनंदन.तसेच हा सन्मान आपल्या देशाच्या इतिहासात मराठीच्या समृद्ध सांस्कृतिक योगदानाची ओळख आहे.मराठी नेहमीच भारतीय वारसाचा आधार राहिला आहे.दरम्यान मला खात्री आहे की अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याने आणखी लोकांना ती शिकण्याची प्रेरणा मिळेल,असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत म्हटले आहे.
दरम्यान अखेर माय मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला! एका मोठ्या लढ्याला यश आले.यासाठी महाराष्ट्र सरकारने सतत पाठपुरावा केला होता.तसेच आपल्या लाडक्या भाषेचा यथोचित सन्मान केल्या बद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदीजी.व केंद्रीय मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांचे आम्ही आभार मानतो.असे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्विट करुन म्हटले आहे. तसेच समस्त मराठी जनांचे हार्दिक अभिनंदन असेही त्यांनी म्हणाले आहे.