पुणे दिनांक ३ ऑक्टोबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) राज्यात लवकरच विधानसभा निवडणूका होणार आहेत.दरम्यान आता महाराष्ट्रात केव्हाही आचारसंहिता लागू शकते.याच पार्श्वभूमीवर राज्य सरकार बैठाकावर बैठका घेण्याचा सपाटाच लावला आहे.असे एकंदरीत चित्र सध्या पाहायला मिळत आहे. दरम्यान मागच्या आठवड्यात पहिल्याच सोमवारी मंत्रीमंडळाची बैठक झाली व त्यात बरेच मोठे निर्णय घेण्यात आले आहेत.आज पुन्हा गुरुवारी मंत्रीमंडळाची बैठक होणार असल्याची माहिती सूत्रांनद्वारे मिळत आहे.त्यामुळे आजच्या कॅबिनेटच्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली होणा-या बैठकीत काय निर्णय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान सोमवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत एकूण ४० निर्णय घेण्यात आले आहेत.दरम्यान आज होणारी ही बैठक या आठवड्यातील दुसरी मंत्रीमंडळा ची बैठक आयोजित करण्यात आली आहे.