पुणे दिनांक ३ सप्टेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) महाविकास आघाडीत जागावाटपाचा तिढा सुटला आहे.दरम्यान विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना गटाचे प्रमुख उध्दव ठाकरे हे आज गुरुवारी दुपारी एक वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत.दरम्यान महाविकास आघाडीत शिवसेना . शरद पवार गट राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व काॅग्रेस पक्षात विधानसभा जागा वाटप जवळपास निश्चित झाले आहे.असे बोलले जात आहे.त्याच पार्श्वभूमीवर आज उध्दव ठाकरे हे मोठी घोषणा करण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.मागील काही दिवसांपासून उध्दव ठाकरे हे मॅरेथॉन बैठका घेत आहेत.ठाकरे गट १०० जागांवर विधानसभा निवडणूका लढण्यास इच्छुक आहे.असे देखील सूत्रांकडून माहिती मिळत आहे.ते आज दुपारी एक वाजता पत्रकार परिषदेत काय बोलणार याकडे आता सर्व शिवसैनिकाचे लक्ष लागले आहे.