पुणे दिनांक ३ ऑक्टोबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) राज्यचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आता त्यांच्या बालेकिल्ल्यातच मोठा धक्का बसणार आहे.दौंडचे माजी आमदार रमेश थोरात हे आता तुतारी हाती घेणार आहे.दरम्यान जेष्ठ नेते शरद पवार यांच्या यांच्या पक्षाकडून तुतारी हाती घेऊन विधान सभेची निवडणूक लढविणार आहे.असे त्यांनी स्पष्ट केले आहे.दरम्यान जेष्ठ नेते शरद पवार यांच्या पक्षाकडून उमेदवारी न मिळाल्यास ते अपक्ष म्हणून देखील निवडणूक लढविणार आहे .असा निर्धारच त्यांनी केला आहे.तसेच रमेश थोरात यांचे समर्थक हे तुतारी चिन्हावरच निवडणूक लढवावी किंवा अपक्ष म्हणून निवडणूक थोरात यांनी लढवावी अशी गळ त्यांना घालत आहेत.तसेच दौंड विधानसभा हा मतदारसंघ भाजप मित्रपक्षाकडे असून तिथं आता भाजपचे आमदार राहुल कुल आहेत.त्यामुळे महायुती कडून त्यांना तिकीट निश्चित मानले जात आहे. त्यामुळे रमेश थोरात यांनी प्रर्याय म्हणून जेष्ठ नेते शरद पवार यांच्या गटात सहभागी होऊन तुतारी चिन्हावर निवडणूक लढवावी अशी दौंड तालुक्यातील कार्यकर्ते यांची भावना मोठ्या प्रमाणावर आहे.तसे त्यांचे प्रयत्न देखील सुरू आहेत .त्यामुळे अजित पवार यांना दौंड मध्ये मोठा धक्का बसणार हे आता निश्चित झाले आहे.