पुणे दिनांक ३ ऑक्टोबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आज नवरात्रीला सर्वत्र सुरुवात होत आहे. दरम्यान आज गुरुवारी नागपूर मध्ये बससेवा कर्मचारी यांनी संप पुकारला आहे.त्यामुळे नागपूर महानगर पालिकाची ‘ आपली बससेवा ‘ आज घटस्थापना दिवशीच पूर्णपणे ठप्प झाली आहे.त्यामुळे नागपूर नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर हाल झाले आहेत. दरम्यान कर्मचाऱ्यांना मागील १४ वर्षांपासून पगार वाढ महानगरपालिकेच्या वतीने देण्यात आली नाही. दरम्यान महागाई दरवर्षी मोठ्या प्रमाणावर वाढत आहे.त्यामुळे तुटपुंज्या पगारावरच हे कर्मचारी काम करीत आहेत.त्यामुळे कर्मचारी यांनी पगारवाढ न मिळाल्याने बेमुदत संपाचा इशारा दिला आहे.दरम्यान बससेवा ठप्प झाल्याने यांचा मोठ्या प्रमाणावर एकूण दीड लाख प्रवाशांना याचा फटका बसला आहे.यात शाळा व कॉलेजचे विद्यार्थी तसेच खाजगी सेवांमध्ये काम करणाऱ्या प्रवाशांना याचा आज फटका बसला आहे.व त्यांना अनेक अडचणीचा सामना करावा लागत आहे.अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे.