Home Breaking News पुण्यातील बोपदेव घाटात फिरायला गेलेल्या मित्राला बेदम मारहाण करुन तरुणीवर गॅंगरेप तरुणीला...

पुण्यातील बोपदेव घाटात फिरायला गेलेल्या मित्राला बेदम मारहाण करुन तरुणीवर गॅंगरेप तरुणीला उपचारासाठी दाखल केले ससून रुग्णालयात

116
0

पुणे दिनांक ४ ऑक्टोबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती आलेल्या अपडेट नुसार पुणे येथील बोपदेव घाटात एका मुलीवर गँगरेप झाल्याची घटना घडली आहे.दरम्यान सदर घटनेबाबत सूत्रां कडून मिळालेल्या माहितीनुसार आज शुक्रवारी मध्य रात्रीच्या सुमारास ही घटना घडली असून संबंधित तरुणीच्या अंगावर जखमा झाल्याच्या आढळून आल्या आहेत.तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.सदर घटनेबाबत कोंढवा पोलिस स्टेशन मध्ये अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार संबंधित २१ वर्षीय तरुणी ही तिच्या मित्रांसमवेत बोपदेव घाटात रात्री फिरण्यासाठी गेली होती.दरम्यान यावेळी अज्ञात आरोपींनी तिच्या मित्राला बेदम मारहाण केली.तसेच या तरुणीवर रात्री ११ वाजण्या च्या सुमारास बलात्कार केला.दरम्यान ज्या ठिकाणी ही घटना घडली तो भाग निर्जन असल्याने व तसेच रात्रीच्या वेळी घटना घडल्याने सदर घटनेची माहिती कोंढवा पोलिसांना आज सकाळी पहाटेच्या सुमारास मिळाली दरम्यान पोलिसांना ही तरुणी जखमी अवस्थेत मिळाली आहे.तसेच तिच्या शरीरावर अनेक गंभीर जखमा झाल्या आहेत.पोलिसांनी तिला उपचारासाठी पुण्यातील ससून रुग्णालयात दाखल केले आहे.आता संबंधित तरुणीवर उपचार सुरू आहेत.दरम्यान या गॅंगरेप प्रकरणी कोंढवा पोलिस हे आरोपींचा शोध घेत आहेत.तसेच या आरोपींच्या शोधा करीता गुन्हे शाखेच्या टीम देखील तैनात करण्यात आल्या आहेत अशी माहिती सह आयुक्त रंजन शर्मा यांनी दिली आहे.दरम्यान पुण्यात अशा घटनांमध्ये दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणावर वाढ होत असताना दिसत आहे.

Previous articleएकविरा आईच्या दर्शनासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज मावळात
Next articleपुणे जिल्ह्यातील इंदापूरातील भाजप कार्यालयावरील बॅनर हटवले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here