Home Breaking News मंत्रालयाच्या जाळीवर आदीवासी आमदारांनी मारल्या उड्या,यात सत्ताधारी आमदारांचा देखील समावेश

मंत्रालयाच्या जाळीवर आदीवासी आमदारांनी मारल्या उड्या,यात सत्ताधारी आमदारांचा देखील समावेश

94
0

पुणे दिनांक ४ ऑक्टोबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आदीवासी समाजाच्या मागण्या मान्य न केल्याने आज आदीवासी समाजाच्या सर्व पक्षांच्या आमदारांनी आज मंत्रालया च्या संरक्षक जाळ्यावर उड्या घेतल्या होत्या.आता पोलिसांनी 👮 या सर्व आमदारांना जाळीवर बाहेर काढण्यात आले आहे.ते आता मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावर सर्व आमदार बसले आहेत.

दरम्यान यात नरहरी झिरवाळ व  खोसकर यांनी आज मंत्रालयात कॅबिनेटची मिंटीग सुरू असताना मंत्रालया च्या संरक्षक जाळ्यावर उड्या मारल्या आहेत. आमच्य मागण्यांकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दुर्लक्ष करत आहेत.असा आदीवासी आमदारांनी आरोप केले आहेत.धनगर समाजाला ST प्रवर्गातून आरक्षण देऊन नये . तसेच पेसा संदर्भात देखील त्यांची मागणी आहे . दरम्यान नरहरी झिरवाळ हे सत्ताधारी महायुतीत सहभागी आहेत.तरी त्यांचे काम होत नाही.सरकारने आजच आमच्या पेक्षा भरतीचा प्रश्न आजच तातडीने सोडवावा तसेच धनगर समाजाला ST प्रवर्गातून आरक्षण देऊ नये.पेसा भरती हे सरकार जाणून बुजून करत नाहीत असा आरोप या सर्व पक्षांच्या आमदारा चार आरोप आहे.आज या आदीवासी आमदारांनी महायुतीच्या सरकारवर टोकाची भूमिका घेऊन हे आजचे आंदोलन केले आहे.दरम्यान यात सत्ताधारी पक्षाचे आमदार नरहरी झिरवाळ हे आज खुपच आक्रमक झाले होते.तसेच सरकारने आमच्या मागण्या मान्य नाही केल्या तर आमच्याकडे प्लॅन बी तयार आहे.असे झिरवाळ यांनी म्हटले आहे.तसेच आम्ही आमच्या मागण्या संदर्भात महाराष्ट्रभर आम्ही आंदोलन करु असे त्यांनी म्हटले आहे.त्यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वाट देखील या आमदारांनी आडवली होती.तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार नरहरी झिरवाळ यांनी महायुतीच्या सरकारच्या विरोधात टोकाची भूमिका घेतली आहे.

Previous articleपुणे जिल्ह्यातील इंदापूरातील भाजप कार्यालयावरील बॅनर हटवले
Next articleमुख्यमंत्र्यांच्या बंदोबस्तासाठी निघालेल्या पोलिस वाहनाला अपघात,१२ पोलिस कर्मचारी जखमी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here