पुणे दिनांक ४ ऑक्टोबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज शुक्रवारी पुणे जिल्ह्यातील मावळ दौऱ्यावर येत आहेत.यावेळी ते खास नवरात्री उत्सवाच्या निमित्ताने कार्ला गडावर एकविरा आईच्या दर्शनासाठी येणार आहेत.दरम्यान याचवेळी ते एकविरा आईचे दर्शन घेणार असून तसेच या गडावरील पाय-याची दुरुस्ती.तसेच संरक्षण भिंत. मुख्यमंदीराची दुरुस्ती तसेच गडावर असलेले विश्रांती कक्ष अशा एकूण ३९.४३ कोटी रुपयांच्या कामांचा शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे.दरम्यान अशी माहिती मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी माध्यामांशी बोलताना दिली आहे.