पुणे दिनांक ४ ऑक्टोबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच नवरात्रीच्या काळातच एक खळबळजनक अपडेट हाती आली असून नवरात्रीच्या उपवासाला भगर खाल्याने देऊळगाव राजा व सिंदखेडराजा तालुक्यातील सुमारे २० पेक्षा जास्त गावातील नागरिकांना भगर मधून विषबाधा झाल्याची घटना घडली आहे.दरम्यान ही रुग्ण संख्या ३०० पेक्षा अधिक आहे.असा या गावातील ग्रामस्थांनी दावा केला आहे.यातील काही रुग्णांवर शासकीय तसेच खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.दरम्यान सदरच्या घटनेबाबत सूत्रांकडून मिळालेल्या माहिती नुसार गुरुवारी दिनांक ३ ऑक्टोबर पासून सर्वत्र नवरात्रोत्सव सुरू झाला आहे.दरम्यान पहिल्याच दिवशी उपवासा करीता अनेकांनी भगर खाल्ली . यातूनच त्यांना गुरुवारी रात्रीच त्रास होऊ लागल्याने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.