पुणे दिनांक ४ ऑक्टोबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील भारतीय जनता पार्टीच्या संपर्क कार्यालयावरील बॅनर हटवण्यात आले आहेत.दरम्यान भारतीय जनता पार्टी मध्ये असलेले व उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कट्टर समर्थक असलेल्या हर्षवर्धन पाटील यांचा जेष्ठ नेते शरद पवार यांच्या गटात प्रवेश आता निश्चित मानला जात आहे.कालच त्यांनी मुंबई येथील शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवास स्थानी भेट घेऊन तब्बल एक तास चर्चा केली आहे. दरम्यान सदरच्या भेटी नंतर हर्षवर्धन पाटील यांच्या कन्या अंकिता पाटील व तसेच चिरंजीव राजवर्धन पाटील यांनी त्यांच्या स्टेटसवर तुतारी चिन्ह ठेवले आहे.दरम्यान इंदापूरचे माजी आमदार हर्षवर्धन पाटील हे दिनांक ६ किंवा ७ ऑक्टोबरला पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका जाहीर करतील व जेष्ठ नेते शरद पवार यांच्या पक्षात प्रवेश करुन तुतारी हाती घेण्याची शक्यता आहे.असे अधिकृत सूत्रांनद्वारे माहिती मिळत आहे.