Home Breaking News मंत्रीमंडळाच्या बैठकीत निर्णय राज्य सरकारचा निर्णयांचा धडाका, कॅबिनेट मध्ये घेण्यात आलेले निर्णय

मंत्रीमंडळाच्या बैठकीत निर्णय राज्य सरकारचा निर्णयांचा धडाका, कॅबिनेट मध्ये घेण्यात आलेले निर्णय

59
0

पुणे दिनांक ४ ऑक्टोबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) राज्यातील अकृषिक कर पुर्णपणे माफ.  महसूल न्यायाधीकरणाच्या अध्यक्ष व सदस्यांसाठी जाहिरातीद्वारे अर्ज मागविण्यात येणार आहे.दौंड येथे बहुउद्देशीय सभागृह नाट्यगृहासाठी शासकीय जमीन. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील किकवी प्रकल्पाच्या कामास गती देणार.टेंभू उपसा सिंचन योजनेस स्व.अनिल भाऊ बाबर यांचे नाव.पूर्णा नदीवर दहा साखळी          बंधा-यांच्या कामांना गती देणार ,सिल्लोड मधील जमिनीला सिंचन

दरम्यान यापुढे प्राचीन व ऐतिहासिक वास्तूंचे नुकसान केल्यास आता दोन वर्षांचा तुरुंगवास व एक लाख रुपये दंडाची तरतूद.राज्यातील खेळाडूंसाठीच्या  पारितोषिकांच्या रक्कमेत वाढ.राज्यातील आणखी १०४ आयटीआय संस्थेचे नामाकरण.संत भगवान बाबा ऊसतोड कामगार अपघात विमा योजना राबविण्यात येणार.तसेच लहान जलविद्युत प्रकल्पां साठी बांधा वापरा व हस्तांतरित धोरण.कोकण पुणे विभागासाठी राज्य आपत्ती प्रतिसाद दोन कंपन्या. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात सुधारीत सेवांतर्गत आश्र्वासित प्रगती योजना.राज्यात आरोग्य क्षेत्रात उत्कृष्टता केंद्र.जैन समाजासाठी अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळ. महाराष्ट्र भूजलाशयीन मच्छीमार कल्याणकारी महामंडळ.आजरा तालुक्यातील वेळवट्टी.गवसे.घाटकरवाडी बंदिस्त पाईप लाईन टाकणार.बंजारा .लमाण तांड्यात ग्रामपंचायतीसाठी लोकसंख्याची अट शिथिल.तसेच कोल्हापूर येथील कागल सागावमध्ये नवीन शासकीय होमिओपॅथी महाविद्यालय. महाराष्ट्र सागरी मच्छिमार कल्याणकारी महामंडळ स्थापन करणार.कुडाळ तालुक्यातील डोंगरेवाडीत साठवण तलाव.बारी .तेली हिंदू खाटीक.लोणारी समाजासाठी आर्थिक विकास महामंडळे.गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजना कायमस्वरूपी राबविण्यात येणार.राळेगण सिध्दी येथे उपसा सिंचन योजनेचे सक्षमीकरण.तसेच राज्यात हरीत एकात्मिक डेटा सेंटर पार्क स्थापन करण्यात येणार.१ लाख ६० हजार कोटींची गुंतवणूक अपेक्षित उच्च तंत्रज्ञानावर आधारित अतिविशाल प्रकल्प योजनेत सुधारणा अधिकाधिक प्रकल्पांना प्रोत्साहन शिरोळ तालुक्यातील गावांमध्ये भूमिगत चर योजना राबविण्यात येणार.बौध्द समाजातील सांस्कृतीक व शैक्षणिक संस्थाना दहा लाखांपर्यंत अनुदान योजना. तसेच वैद्यकीय अधिकाऱ्यांना सातव्या वेतन आयोगा प्रमाणे व्यवसायरोध भत्ता देणार.तसेच सोलापूर ते मुंबई हवाई मार्गासाठी व्हायबिलिटी गॅप फंडिंग देणार. डेक्कन कॉलेज.गोखले संस्था.टिळक महाराष्ट्र मधील कर्मचाऱ्यांना सुधारीत आश्र्वासित प्रगती योजना. वडाळा साॅल्ट पॅनमधील भूखंड शैक्षणिक कारणासाठी तसेच रमाई आवास.शबरी आवास योजनेतील घरकूल अनुदानात वाढ.असे निर्णय आजच्या कॅबिनेट मंत्री मंडळाच्या बैठकीत घेण्यात आले आहेत.

Previous articleमुख्यमंत्र्यांच्या बंदोबस्तासाठी निघालेल्या पोलिस वाहनाला अपघात,१२ पोलिस कर्मचारी जखमी
Next articleभारतीय क्रिकेटपटूंच्या आईचा पुण्यात संशयास्पद मृत्यूने एकच खळबळ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here