Home Breaking News मुख्यमंत्र्यांच्या बंदोबस्तासाठी निघालेल्या पोलिस वाहनाला अपघात,१२ पोलिस कर्मचारी जखमी

मुख्यमंत्र्यांच्या बंदोबस्तासाठी निघालेल्या पोलिस वाहनाला अपघात,१२ पोलिस कर्मचारी जखमी

76
0

पुणे दिनांक ४ ऑक्टोबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच नाशिक येथून एक खळबळजनक अपडेट हाती आली असून.नाशिक मधील चांदवड येथील राहुड घाटात 👮 पोलिसांच्या वाहनांला भीषण अपघात झाला आहे.सदरच्या अपघातात नाशिक ग्रामीणचे एकूण १२ पोलिस कर्मचारी हे जखमी झाले आहेत  त्यांना चांदवडच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी  दाखल करण्यात आले आहे.यात काही पोलिसांच्या डोक्याला तर काही पोलिसांच्या पायाला जबर मार लागला आहे. दरम्यान सूत्रांकडून मिळालेल्या माहिती नुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत.त्यांच्या बंदोबस्त करीता हे नाशिक ग्रामीणचे पोलिस जात असताना हा अपघात झाला आहे.दरम्यान हा अपघात कसा झाला हे अद्याप स्पष्टपणे कळू शकलेले नाही.

Previous articleमंत्रालयाच्या जाळीवर आदीवासी आमदारांनी मारल्या उड्या,यात सत्ताधारी आमदारांचा देखील समावेश
Next articleमंत्रीमंडळाच्या बैठकीत निर्णय राज्य सरकारचा निर्णयांचा धडाका, कॅबिनेट मध्ये घेण्यात आलेले निर्णय

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here