Home Breaking News शिवसेनेचे मंत्री संजय राठोडांच्या कारला मध्यरात्रीच्या सुमारास अपघात

शिवसेनेचे मंत्री संजय राठोडांच्या कारला मध्यरात्रीच्या सुमारास अपघात

49
0

पुणे दिनांक ४ ऑक्टोबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) महायुतील शिवसेना शिंदे गटाचे आमदार व  जलसंधारण मंत्री संजय राठोड यांच्या कारचा अपघात झाला आहे.मात्र सुदैवाने या अपघातात राठोड हे वाचले आहेत.दरम्यान या अपघाताबाबत सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार आज पहाटेच्या सुमारास मध्यरात्री दोन वाजता हा अपघात झाला आहे.यवतमाळच्या कोपरा गावात त्यांच्या कारने मिनी अशोक लेलॅंड या टेम्पोला पाठीमागच्या बाजूने जोरात धडक दिल्याने झालेल्या अपघातामुळे टेम्पोचा चालक हा गंभीर रित्या जखमी झाला आहे.यानंतर जखमी टेम्पो चालकाला यवतमाळ येथील एका रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.दरम्यान या अपघातात मंत्री राठोड यांच्या कारचा मात्र चक्काचूर झाला आहे.

Previous articleमराठीला अभिजात भाषेचा दर्जा केंद्रीय मंत्रीमंडळाचा ऐतिहासिक निर्णय -अजित पवार
Next articleएकविरा आईच्या दर्शनासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज मावळात

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here